रत्नागिरी, : जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘आजचा नवोन्मेष, उद्याचे सुदृढ पोषण’ या संकल्पनेवर आधारित मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १९ स्पर्धकांनी, ३३ पदार्थांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. केतनकुमार चौधरी होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात मत्स्य पदार्थांचे पोषणमूल्य आणि स्वयंरोजगार निर्मितीतील त्यांचे महत्त्व विशद केले. मत्स्य पदार्थांवर आधारित विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, तसेच लोकांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी मत्स्य आहार महत्त्वाची भूमिका बजावतो, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला सुवर्णा चौधरी, अध्यक्षा, इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी, तसेच डॉ. संदीप सखाराम करे, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन, सचिव रोटे . सीताराम सावंत, राजेन्द्र कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचा मुख्य उद्देश मत्स्य व सागरी खाद्यपदार्थांचे पौष्टिक महत्त्व, आहारातील त्यांचा उपयोग, मत्स्य उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि नावीन्यपूर्ण पाककृतींबाबत जनजागृती करणे हा होता. स्पर्धकांनी विविध प्रकारचे मत्स्य पदार्थ सादर केले. परीक्षकांनी पदार्थांची चव, गुणवत्ता, सादरीकरण आणि पाककलेतील नावीन्य या निकषांवर परीक्षण करून विजेत्यांची निवड केली. स्पर्धेतील पदार्थांचे परीक्षण मेघना विनायक शेलार, विभागप्रमुख, फूड प्रॉडक्शन विभाग (किचन), एस. पी. हेगशेट्ये कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी स्टडीज; अनिकेत बडबे, शेफ, गद्रे मरीन, रत्नागिरी; आणि डॉ. आसिफ पागारकर, प्राध्यापक, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी यांनी केले. स्पर्धेत दीपिका दिनेश कुबल यांनी प्रथम क्रमांक, विशाखा विवेक पिलणकर यांनी द्वितीय क्रमांक, तर मीनाक्षी आतिश कीर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिके अनिरुद्ध श्रीकांत शारंगंधर, वैदेही राजेश चव्हाण, जान्हवी साखरकर आणि वैष्णवी आनंद यादव यांना प्रदान करण्यात आली.
प्रथम क्रमांकासाठी ३,००० रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी २,००० रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकासाठी १,००० रुपये व सन्मानचिन्ह, तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी ५०० रुपये देण्यात आले. या पारितोषिकांचे प्रायोजकत्व रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांनी स्वीकारले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजयकुमार तोरणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आणि कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वरवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील सर्व कर्मचारी तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे मत्स्य आहाराचे पोषणमूल्य, मत्स्य उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि त्याद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.