loader
Breaking News
Breaking News
Foto

२६ गाव ग्रुप इंदापूर विभाग बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक चारच्या अध्यक्षपदी संतोष मोरे यांची नियुक्ती

साई /माणगांव (हरेश मोरे) - माणगांव तालुक्यातील इंदापूर विभागातील तरुणांचे स्फूर्तीस्थान, सामाजिक व धार्मिक चळवलीत सतत अग्रेसर असणारे पानसई गावचे तरुण नेतृत्व संतोष मोरे यांची २६ गाव ग्रूप इंदापूर विभाग बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक चार या शाखेच्या अध्यक्षपदी १ नोव्हेंबर २०२६ रोजी इंदापूर संबोधी विहार समिती येथे नामदेव राव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे माणगांव तालुक्यात तसेच इंदापूर विभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बौद्धजन पंचायत समितीचे उपकार्याध्यक्ष अंकुश सकपाळ, मानखुर्द गट क्र.५२ विभागाचे राजेश सकपाळ, संबोधी विहार समितीचे कार्याध्यक्ष सयाजी मोरे, समितीचे सचिव शुक्रदास मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. इंदापूर विभाग शाखेत नवनिर्वाचित उपाध्यक्ष पदी दीपक गायकवाड, उपाध्यक्ष संदीप जाधव, सचिव मुकेश सकपाळ, सहसचिव गौतम साळवी, खजिनदार राजेंद्र राव, सहखजिनदार कमलाकर राव यांची नियुक्ती करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

या निवडीमुळे समाजातील संघटन, ऐक्य, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कामाला गती व दिशा निर्माण होईल असे उपस्थित मान्यवर यांनी विचार व्यक्त केले.तसेच संतोष मोरे यांनी अध्यक्ष पदाचा स्वीकार करून पुढील असणारी समाजहिताची कामे, धम्म प्रबोधन या कामात सदरची नियुक्त झालेले शाखा पदाधिकारी वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करतील, असे संबोधित केले. त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg