loader
Breaking News
Breaking News
Foto

सावर्डे पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून उघड; पालघर जिल्ह्यातील चार आरोपी ताब्यात

चिपळूण - सावर्डे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १५२/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३१(४), ३०५ (अ) अन्वये दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील संशयित वाहन आणि आरोपींचा शोध घेण्याच्या अनुषंगाने रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत पालघर जिल्ह्यातील चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या मोबाइल टॉवरच्या तीन बॅटर्‍यांसह गुन्ह्यात वापरलेले वाहन व अन्य साहित्य असा एकूण रुपये ४,२२,६००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास व आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शासकीय वाहनाने रत्नागिरी ते चिपळूण विभागात पेट्रोलिंग करीत असताना, दिनांक १८/११/२०२६ रोजी मध्यरात्री ००.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी फाट्याच्या पुढे असलेल्या ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंटसमोर सदर गुन्ह्यातील संशयित वाहन उभे असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पथकाने पंचांसमक्ष सदर वाहनाची खात्री केली असता, वाहनामध्ये खालील नमूद इसम आढळून आले. जयप्रकाश एकनाथ चिंदरकर, वय ३२ वर्षे, रा. विरार पूर्व, गणपती मंदिर शेजारी, जि. पालघर, नवनाथ भगवान उतेकर, वय ३६ वर्षे, रा. साईनाथ, साई सावली अपार्टमेंट, विरार पूर्व, जि. पालघर, कौशिक प्रभाकर जाधव, वय २७ वर्षे, रा. येसूबाई कंपाऊंड, सिद्धिविनायक बी विंग, विरार, जि. पालघर, मंगेश मनोज गुरव, वय २० वर्षे, रा. मोरेगाव तलाव, नालासोपारा, जि. पालघर. सदर आरोपी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या टॉवरच्या एकूण तीन बॅटर्‍या, किंमत रुपये २२,५००/-, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेले संशयित वाहन असा एकूण रूपये ४,२२,६००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

ताब्यात घेतलेले आरोपी व हस्तगत मुद्देमाल पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी सावर्डे पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहेत. सदरची कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पो.हवा/९०९ विजय आंबेकर, पो.हवा/१२२८ वैभव मोरे, पो.हवा/३०६ गणेश सावंत व चा.पो.हवा/२१५ अतुल कांबळे या पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg