मंडणगड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने कोकण विभागातील संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने आयोजित जिल्हाध्यक्ष व जिल्हा महामंत्र्यांची विशेष संघटनात्मक कार्यशाळा रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाणे येथील सीकेपी हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या कार्यशाळेच्या माध्यमातून कोकण विभागातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून अनुसूचित जाती मोर्चाला राज्यात आदर्श संघटन म्हणून नावारूपाला आणण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेला ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, आमदार तथा प्रदेश महामंत्री ॲड. माधवी नाईक आणि आमदार तथा प्रदेश महामंत्री ॲड. निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संघटनात्मक विस्तार, पक्षाची विचारधारा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणे, कार्यकर्त्यांची सक्रियता वाढविणे आणि आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कृपाल कांबळे, प्रदेश महामंत्री राहुल कांबळे, प्रदेश सचिव प्रणाली सावर्डेकर, ठाणे जिल्हाध्यक्ष वीरसिंग पारछा, प्रदेश कार्यकारिणी मंत्री शिरीष रामदासी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंकुश जाधव व सुरेश गायकवाड, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे, उल्हासनगर जिल्हाध्यक्ष विशाल खंदारे, उल्हासनगर जिल्हा महामंत्री कमल जाधव, उल्हासनगर महासचिव शशिकांत कायदे यांच्यासह कोकण विभागातील विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान कोकण विभागातील विविध जिल्ह्यांच्या संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मोर्चाची संघटनात्मक रचना अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण रचनात्मक ठराव व प्रस्ताव मांडण्यात आले. तसेच समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचविणे, त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि पक्षाची विचारधारा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्योदयाचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविणे, अनुसूचित जाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनात्मक स्तरावर प्रभावीपणे कार्य करणे आणि वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, असा सामूहिक संकल्प यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. एकूणच, या संघटनात्मक कार्यशाळेमुळे कोकण विभागातील अनुसूचित जाती मोर्चाच्या आगामी वाटचालीला नवी ऊर्जा, दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे. केवळ पदापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष जनसंपर्क, समाजसेवा, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि तळागाळातील संघटनविस्तार यावर भर देत कोकण विभागाचा अनुसूचित जाती मोर्चा राज्यातील एक आदर्श संघटन म्हणून उभा करण्याचा ठाम निर्धार या कार्यशाळेतून व्यक्त झाला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.