loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळे पोखरबाव येथून ३० वर्षीय अक्षय धुरीचे अपहरण वडिलांच्या तक्रारीवरून देवगड पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी)देवगड तालुक्यातील दाभोळे पोखरबाव येथून अक्षय संजय धुरी (वय ३०) या तरुणाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अक्षय याचे वडील संजय वासुदेव धुरी (वय ५६) यांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास दाभोळे पोखरबाव येथील राहत्या घरातून अक्षय संजय धुरी याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण करून नेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. नातेवाईक तसेच आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेतल्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.०५ वाजता देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४० (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक व्हॅनही घटनास्थळी बोलावण्यात आली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पवार करीत आहेत. अक्षय धुरी याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, या अपहरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg