loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा रत्नागिरीत उत्साहात

रत्नागिरी : जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा आज कसोप ते कोळंबे फाटा या मार्गावर उत्साहात झाली. जिल्हा क्रीडा परीषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा सायकलिंग असोसिएशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेतून विभागीय स्पर्धेसाठी सायकलपटूंची निवड होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी, श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाचे कार्यकारिणी सदस्य चेतन साळवी, मुख्याध्यापिका नेत्रा राजेशिर्के यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक (व्हॉलीबॉल) गणेश खैरमोडे यांनी स्पर्धेचे संयोजन केले. तांत्रिक साह्य रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेमध्ये टाईम ट्रायल या प्रकारात १४ वर्षे मुलांच्या गटात प्रथम- शिवम आलदर (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण), द्वितीय- अधिराज कवितके (जीजीपीएस रत्नागिरी), १४ वर्षे मुलींच्या गटात प्रथम- मृणाल आलदर (युनायटेड इंग्लिश स्कूल), १७ वर्षे मुलांच्या गटात प्रथम- आयुष शिंदे (ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोली), द्वितीय- वरद कदम (ज्ञानदीप विद्यामंदिर) आणि तृतीय- ईशान वझे (आगवेकर विद्यालय, चिपळूण), १७ वर्षे मुलींच्या गटात प्रथम- आध्या कवितके (अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी) यांनी यश मिळवले. १४ वर्षे मुलांच्या मास स्टार्ट या प्रकारात प्रथम- रुद्र जाधव (जीजीपीएस) आणि द्वितीय- दिशांत पवार (एलटीटी इंग्लिश स्कूल, खेड) यांनी यश मिळवले. या स्पर्धेत टाईम ट्रायल प्रकारात स्वराज राजपुरकर (संतोषभाई मेहता स्कूल, खेड), श्रावणी खानविलकर (श्रमिक विद्यालय, शिवार आंबेरे) यांनीही सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे उपाध्यक्ष दर्शन जाधव यांच्यासमवेत सदस्य विशाल भोसले, प्रसाद देवस्थळी, प्रसाद खेडेकर, विनायक पावसकर, प्रमोद लिंगायत, नारायण पाटोळे, हृषिकेश पुरोहित, अमित पोटफोडे, केदार देवस्थळी, उत्तम पवार, मकरंद पटवर्धन आणि चिपळुणचे श्रीनिवास गोखले आणि खेडमधील सिद्धेश बांदिवडेकर यांनी सहकार्य केले. तसेच संस्थाध्यक्ष कमलाकर साळवी, सचिव सागर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाने स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले. जिल्हा रुग्णालयातर्फे रुग्णवाहिका सुविधा आणि वाहतूक शाखेचे दोन पोलिसही कार्यरत होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धकांचे स्वागत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्या वाजवून केले व प्रोत्साहन दिले. शाळेने स्पर्धक व पालक, स्वयंसेवकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था देखील केली. तसेच दरवर्षी स्पर्धा येथे चांगल्या प्रकारे आयोजित करण्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg