खेड (प्रतिनिधी) - अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या रोमहर्षक सामन्यात शेवटच्या व निर्णायक चढाईमध्ये बोनस गुण प्राप्त करत संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दादासाहेब सरफरे विद्यालय शिवने - बुरंबीच्या संघाने अंतिम सामन्यात मातब्बर रत्नागिरीच्या संघाला नमवत जिल्हास्तरावर शानदार विजय खेचुन आणला आहे. अर्थव गेल्येच्या धडाकेबाज चढाईमुळे तसेच रुद्र बोथले व यश पड्याळ यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळामुळे विजयी पताका फडकवली. पहिल्या सेमी फायनलयमध्ये संगमेश्वरच्या दादासाहेब सरफरे विद्यालयाने गत वर्षीच्या विजेत्या दापोली संघाला पराभुत करुन अंतिम सामन्यात धडक मारली. तर दुसर्या सेमीत खेडवर रत्नागिरी संघाने मात करुन अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
अंतिम सामन्यात सुरुवातीपासुन रत्नागिरी संघाने संगमेश्वरच्या सरफरे विद्यालयाच्या संघावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला होता. अथर्व गेल्येच्या धडाकेबाज यशस्वी चढाईमुळे मध्यंतरानंतर बाजी पलटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरी देखील शेवटच्या पाच मिनीटांपूर्वी रत्नागिरीकडे दहा गुणांची लीड होती. यावेळी सामना रत्नागिरीच्या बाजूने झुकणार अशी शक्यता निर्माण झाली. मात्र अथर्व गेल्ये, रुद्र बोथले आणि यश पड्याळ यांनी केलेल्या चांगल्या खेळाच्या प्रदर्शनामुळे सरफरे संघाने रत्नागिरीवर शेवटच्या पाच मिनिटांत लोण देत सामना पलटवला. आणि शेवटच्या क्षणापर्यंत सामना निर्णायक स्थितीत राहिला होता. याचवेळी आपल्या सरफरे विद्यालयाच्या संघाकडे शेवटची चढाई असल्याने कबड्डी प्रशिक्षक शिक्षक सुहास पाब्ये यांनी अथर्वला दिलेला कान मंत्र अथर्वने अंमलात आणला. खरंतर काही सेकंदांचा खेळ शिल्लक असताना शेवटच्या चढाईत वेळ काढणं महत्त्वाचं होतं आणि तेच अथर्वने लीलया साध्य केलं. पहिले १२-१५ सेकंद शांत डोक्याने वेळ काढला आणि नंतर चढाईत वेग घेऊन बोनस मारला.
हाच बोनस गुण संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरफरे विद्यालयाच्या संघाला विजयावर मोहोर उमटवणारा ठरला. आणि मातब्बर रत्नागिरी संघाला हार पत्करुन उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. जिल्हास्तरावर शानदार विजय संपादन केलेल्या सरफरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱे शिक्षक सुहास पाब्ये, सुरेंद्र कुळ्ये, सुरज जाधव, सुनिल पवार यांचे बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था पदाधिकारी, संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक वृंद आणि तालुकाभरातुन अभिनंदन आणि कौतुक होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.