चिपळूण (संतोष पिलके) : भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही केवळ राजकीय सत्तेपुरती मर्यादित नसून राष्ट्रहित, भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि देशाच्या सुरक्षेच्या व्यापक संकल्पनेवर आधारित आहे. हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा जपण्यासोबतच राष्ट्ररक्षणाची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वीकारली पाहिजे. पक्षाची वैचारिक भूमिका समजून घेऊन राष्ट्रहितासाठी कटिबद्ध राहणे ही काळाची गरज आहे, असे परखड प्रतिपादन भाजप नेते प्रमोद जठार यांनी केले. चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित 'राष्ट्रचिंतन' बैठकीत ते बोलत होते. 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' अभियानांतर्गत आयोजित या बैठकीत मोदी सरकारच्या वाटचालीचा आढावा घेण्यासह एसआयआर प्रक्रियेवरून विरोधकांकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले.
जठार यांनी भारताच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेचा संदर्भ देताना वैदिक काळापासून या देशात विविध धर्म, भाषा आणि संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे सांगितले. सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील विस्तीर्ण भारतापासून आधुनिक भारतापर्यंतचा सांस्कृतिक प्रवास त्यांनी विशद केला. देशाच्या भौगोलिक सीमा बदलल्या, राजकीय स्थित्यंतरे झाली; मात्र भारताची सांस्कृतिक ओळख कायम राहिली. हा अमूल्य वारसा जपण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांनी पार पाडली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात भाजप कार्यकर्त्यांची खरी अग्निपरीक्षा असणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींमुळे विचलित न होता राष्ट्ररक्षण, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संघटनात्मक बांधिलकी या मूलभूत विचारांवर कार्यकर्त्यांनी ठाम राहावे, असे आवाहन त्यांनी केले. भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रास्ताविकात देशातील सद्य राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रचिंतन बैठकीचे महत्त्व स्पष्ट केले. लोकशाही वाचविण्याच्या नावाखाली सुरू असलेली आंदोलने, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले जाणारे प्रश्न आणि विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी याबाबत कार्यकर्त्यांनी वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, महिला मोर्चा ओबीसी जिल्हाध्यक्षा वैशाली निमकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, कायदा सेल जिल्हा संयोजक अॅड. मिलिंद तांबे, चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, माजी नगरसेवक विजय चितळे, माजी सभापती रामदास राणे, संकेत घाग, डॉ. सुनील सावंत आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी नवनिर्वाचित भाजप चिपळूण शहर मंडल अध्यक्ष आशिष खातू आणि महिला मोर्चा शहराध्यक्ष रुही खेडेकर यांचा भाजप नेते प्रमोद जठार व जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ओबीसी मोर्चा प्रदेश कोकण संघटक संतोष नलावडे, जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. नयना पवार, निमंत्रित सदस्य स्वप्ना यादव, जिल्हा परिषद सदस्या रावी मोरे, पंचायत समिती सदस्य तथा चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, सायली वाजे, सुप्रिया देवरूखकर आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी केले, तर आभार रुही खेडेकर यांनी मानले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.