चिपळूण - मौजे मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथील रहिवासी प्रताप सुर्वे (सुर्वे सर) यांच्या मालकीच्या आंबा-काजू बागेतील विहिरीमध्ये एक वन्यप्राणी पडल्याची माहिती त्यांनी वन विभागाचे एस. एस. सावंत, वनपाल चिपळूण यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या बचाव पथकातील एस. एस. सावंत, वनपाल चिपळूण, राहुल गुंठे, वनरक्षक रामपूर, कृष्णा इरमले, वनरक्षक कोळकेवाडी व RRT टीमचे सदस्य अथर्व घाग यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या वन्यप्राण्याची पाहणी केली असता, सदर प्राणी हा ससा नसून दुर्मिळ पिसोरी हरण (Mouse Deer) असल्याचे निदर्शनास आले.
वन विभागाच्या बचाव पथकाने सदर पिसोरी हरणाची सुरक्षित सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी हरणाने विहिरीतील पाण्यात उडी मारून पोहण्यास सुरुवात केली. बचाव पथकाने अथक प्रयत्न करून जाळीच्या साहाय्याने त्यास सुरक्षितपणे पकडले व पिंजऱ्यात ठेवून त्याची वैद्यकीय व शारीरिक स्थिती तपासली. सदर पिसोरी हरीण सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. सदर बचावकार्य गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) व एस. एस. खान, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.