loader
Breaking News
Breaking News
Foto

मारळ ग्रामपंचातीच्या पाणी योजनेच्या मुख्य पाईपलाईनचे महामार्ग ठेकेदाराकडून नुकसान

देवरुख सुरेश सप्रे : मारळ ते मार्लेश्वर रस्त्याचे काम प्रगतीपथावर असताना संबंधित ठेकेदाराकडून वारंवार मारळ ग्रामपंचायत येथील हद्दीतील मुख्य पाईपलाईनचे वारंवार नुकसान होत आहे तरी त्या संकटाचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर प्रशासनाकडून योग्य ती दखल घेण्यात येणार आहे का असा सवाल मारळ ग्रामस्थांकडून होत आहे. आज झालेल्या पाईपलाईनचे नुकसान त्यामुळे मारळ गावातील ग्रामस्थांना दोन दिवस पाणी मिळणे अशक्य आहे तरी त्यावर संबंधित प्रशासनाने ठेकेदाराबाबत योग्य ती कारवाई करून ग्रामपंचायत व ग्रामस्थांना योग्य सहकार्य करावे. सध्या राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केल्यामुळे सध्या महाराष्ट्रभर भिषण पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. त्यात संबंधित ठेकेदाराकडून वारंवार होणारे पाईपलाईनचे नुकसान ग्रामस्थांच्या तोंडाचे पाणी काढत असून संबंधित प्रशासन मात्र सुस्त आहे.

टाइम्स स्पेशल

या वाढत्या अडचणी बघता जिल्हा परिषद विभागाने त्यावर तात्काळ मार्ग काढून ठेकेदाराकडून सर्व पाईप लाईन दुरूस्त करून घ्यावी व भविष्यात येणारे अडचणी होणार नाहीत याची संबंधित ठेकेदारने काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg