loader
Breaking News
Breaking News
Foto

वनराई बंधारे उभारणीच्या ठिकाणांची माहिती संकलित करा, मालवण तहसीलदारांचे निर्देश

मालवण (प्रतिनिधी) - अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागात पंचनामे करताना केवळ नुकसानीची नोंद न करता भविष्यातील जलसंधारणाच्या दृष्टीने 'वनराई बंधारे' उभारता येतील अशा ठिकाणांची माहिती संकलित करण्याचे निर्देश मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिले आहेत. याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच कृषी सहाय्यकांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. पीक पंचनाम्याची कार्यवाही करताना संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंचनामा करताना संबंधित क्षेत्रातील स्थानिक नागरिक, शेतकरी, ग्रामस्थ तसेच संबंधित व्यक्तींशी चर्चा करून गावातील पाण्याची उपलब्धता, पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह, नाल्यांची सद्यस्थिती आणि भौगोलिक परिस्थिती यांचा विचार करावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पाहणीदरम्यान वनराई बंधारे बांधणे शक्य असलेल्या ठिकाणांची माहिती संकलित करून स्वतंत्र अहवालाद्वारे तहसील कार्यालयाकडे तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेतीसह स्थानिक जलस्रोतांसाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासोबतच जलसंधारणासाठी संभाव्य ठिकाणांची माहिती प्रशासनाच्या हाती येणार आहे. पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना गावातील पाण्याची उपलब्धता, पावसाच्या पाण्याचा प्रवाह, नाल्यांची स्थिती आणि भौगोलिक रचना यांचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पंचनामा प्रक्रियेला जलसंधारणाच्या उपाययोजनांची जोड मिळणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg