loader
Breaking News
Breaking News
Foto

एलटीटी स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

खेड : तालुक्यातील खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूल व ज्युनि. कॉलेज, खेड या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी या उद्देशाने दि. २१ नोव्हेंबर रोजी 'विज्ञान प्रदर्शना' चे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने तसेच विज्ञान प्रतिकृती मांडण्यात आलेल्या दालनांचे फीत कापून मोठ्या उत्साहात करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी परवेज मुकादम, माजिद खतीब, समन्वयक सेबास्टियन जॉय, समन्वयिका एल्सी, मुख्याध्यापक जी. बी. सारंग, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उत्तमकुमार जैन व पदाधिकारी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रदर्शनात एकूण ६० विज्ञान प्रयोग व प्रतिकृती समाविष्ट होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी शेती तंत्रज्ञान, सौर यंत्रणा, पाण्याचे शुद्धीकरण, ज्वालामुखी उद्रेक, जलव्यवस्थापन, आरोग्य अशा अनेक नाविण्यपूर्ण विषयांवर आधारित आकर्षक अशा विज्ञान प्रतिकृती तयार करत त्यांचे सर्वांसमोर आत्मविश्वासपूर्वक उत्तमरित्या सादरीकरण केले. विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या प्रतिकृती पालक, माजी विद्यार्थी व प्रशालेतील विद्यार्थी अत्यंत उत्साहाने पाहत समजून घेत होते. यामधील अनेक प्रतिकृती लक्ष्यवेधी ठरल्या. सर्वांनीच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, प्रेमळ चिखले, जयेश गुहागरकर, चंद्रकिरण वैद्य, डॉ. पुष्कर नेने, विलीन पाटणे यांनी या विज्ञान प्रदर्शनासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रदर्शनातील विज्ञान प्रतिकृतींचे परीक्षण आदिब मुकादम, पूजा जाधव, रुपाली कांचनकोट्टी, कादिरी, मधू वैद्य, गौरी पाटणे यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आफरीन कौचाली यांनी केले. तसेच प्रदर्शनाबाबतचे नियोजन सतिश योगी, सायली कांबळे यांनी केले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg