loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांविरोधात पहिली सुनावणी, ज्ञानेशकुमारांचे तात्काल निलंबन नाही, पण एकतर्फी निर्णय असेल तर एसआयआरला स्थगीती?

नवी दिल्ली - आज सर्वोच्च न्यायालयात निवडणुक आयोगाच्या आयुक्तांविरोधात पहिली सुनावणी पार पडली. त्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयुक्तांविरोधात अंतिम आदेश देण्यास नकार दिला. ज्ञानेशकुमार यांना पदावरुन हटविण्याचा आदेश तातडीने घेता येत नाही, मात्र न्यायालयाने या पकरणामध्ये निवडणुक आयोगाला नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये आठवड्यापर्यंत उत्तर द्यायचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पहिल्या दिवशी या प्रकरणात याचिकाकर्त्यांचे वकील विकास सिंह यांचा युक्तीवाद न्यायालयाने ऐकून घेतला. विकास सिंह यांनी २०२३च्या कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे. कलम १६ अनुसार मुख्य निवडणुक आयुक्तांना अमर्याद संरक्षण मिळते, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच मुख्य निवडणुक आयुक्तांना तत्काल निलंबित करावे, अशी मागणी करीत सध्या त्यांना काम करु देवू नये, असेही विकास सिंह यांनी न्यायालयासमोर बोलताना सांगितले. परिस्थिती खूपच वाईट आहे, नियमाविरुद्ध काम करीत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या अंतिम आदेशाची गरज आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला. जस संरक्षण आयुक्तांना आहे. तस पंतप्रधान आणि न्यायाधिशांनाही नाही, असे युक्तीवाद करताना त्यांनी म्हटले.

टाईम्स स्पेशल

याबाबत न्यायालयाने वृत्तपत्रातील बातमीवर तुमचा विश्वास आहे का? असा सवाल याचिकाकर्त्यांच्या वकिलांना केला. न्यायमूर्ती बागची यांनी एसआयआरवर सहमतीने निर्णय झाला नसेल तर त्याला तात्पूर्ती स्थगीती देवू शकतो, असे म्हटले आहे. याबाबत उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाला आठवडाभराची मुदत देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी एकतर्फी निर्णय घेतला आहे. तसेच निवडणुक आयोग ही बहुसदस्यीय घटनात्मक संघटना असल्याने तिचे निर्णय एकतर्फी घेतले जावू शकत नाहीत, अशी घोषणा करण्याची मागणी केली. दुसर्‍या याचिकेत अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी कथितरित्या एकतर्फी घेतलेले १४ निर्णय रदद करण्याची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg