loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबडगाव येथे लोकसहभागातून बंधारा उभारणीचा उपक्रम संपन्न

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील आंबडगाव ग्रामपंचायत हद्दीत लोकसहभागातून बंधारा बांधण्याचा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. जलसंधारण व पाणी संवर्धनाला चालना देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, पंचायत समिती सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पंचायत समिती सदस्य सायली निंबाळकर तसेच शिंदे शिवसेना पदाधिकारी राजू निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याचे संवर्धन, भूजल पातळी वाढविणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. दरम्यान, पंचायत समिती कार्यालय, दोडामार्ग यांच्या पत्रानुसार पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाच्या माध्यमातून या जलसंधारण उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत लोकसहभागातून बंधारा बांधण्याच्या उपक्रमाला प्रत्यक्ष सहभाग मिळाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg