loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी जलसंपदा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे तेरवण मेढे कालव्यातील लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया - फ्रान्सिस लोबो

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने पाणी बचत करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुष्काळ ग्रस्त जिल्ह्यातील गावांना इतर धरणातून किंवा टॅकर मधून पाणी पुरवठा केला जात आहे. पण तिलारी जलसंपदा विभागाच्या ताब्यात असलेल्या तेरवण मेढे धरणाच्या कालव्याच्या गळतीमुळे दर दिवशी लाखो लिटर पाणी चक्क रस्त्यावर वाहत येऊन वाहन धारकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे. सदर पाणी गळतीला जलसंपदा विभाग स्थानिक अधिकारी जबाबदार आहेत, असे येथील शेतकरी फ्रान्सिस लोभो यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिलारी धरणाच्या बाजूला असलेल्या तेरवण मेढे उन्नेयी बंधारा उजव्या कालव्यातून भटवाडी, घोटगेवाडी, घोटगे, परमे, दरम्यान पाणी पुरवठा केला जातो. याच कालव्यातून मोठया प्रमाणात पाणी हे दोडामार्ग ते विजघर मुख्य रस्ता पाताळेश्वर देवस्थान नजीक चक्क वाहून रस्त्यावर येत आहे. रस्त्यावर तळयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी गोळा झाल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. समोर चारचाकी वाहन आल्यावर पाणी दुचाकी आणि पादचार्‍यांच्या अंगावर उडते. गेल्या काही दिवसांपासून ही गळती सुरू आहे. संबंधित जलसंपदा विभाग कर्मचारी अधिकार्‍यांना पाण्याबाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही हेच दिसून येते, असे फ्रान्सिस लोबो यांनी सांगितले. पण कोणत्याही प्रकारची उपाययोजना किंवा पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg