loader
Breaking News
Breaking News
Foto

रानडुकराला वाचवताना झालेल्या दुचाकीचा अपघातात ५५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

लांजा (संजय साळवी) - रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या रानडुकरांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात मागील सीटवर बसलेल्या एका ५५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रकांत नारायण गुरव (५५ वर्षे, रा. गोविळ गुरववाडी, ता. लांजा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. देवधे - पुनस - पावस मार्गावरील उपळे फाट्याजवळ शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी रात्री हा अपघात घडला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत गुरव हे त्यांचे भाचे अनिकेत गोपीनाथ गुरव (३५ वर्षे, रा. गवाणे गुरववाडी, ता. लांजा) यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच ०८ बीजी ९६९०) मागील सीटवर बसून गवाणे येथून देवधे - पुनस - पावस मार्गावरून सापुचेतळे येथे जात होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील उपळे फाटा येथे त्यांची दुचाकी आली असता त्यांच्या दुचाकीसमोर अचानक चार ते पाच रानडुकरे आडवी आली.

टाईम्स स्पेशल

या रानडुकरांना वाचविण्यासाठी अनिकेत यांनी दुचाकीला ब्रेक लावला. मात्र दुचाकी घसरून दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात चंद्रकांत गुरव गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg