loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्याच्या दुष्काळ निकषांपासून ते निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्नांपर्यंत, शिवसेना (उबाठा) पक्षाने प्रशासनाचे लक्ष वेधले

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश का झाला नाही, तसेच निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करावी, अशा विविध गंभीर मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवेदने तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्याकडे सादर केली आहेत. निवेदनात अनेक तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आलेला असताना लांजा तालुका त्यातून वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, दुष्काळ निर्धारणासाठी वापरण्यात आलेले निकष, पर्जन्यमान, पर्जन्यखंड, पीकस्थिती, जमिनीतील ओलावा आणि इतर संबंधित निदर्शकांचा अधिकृत मूल्यांकन अहवाल उपलब्ध करून द्यावा, दुष्काळाच्या निकषावर पारदर्शकता असायला पाहीजे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. केवळ कागदोपत्री आकडेवारीवर निर्णय न घेता तालुक्याची गावनिहाय फेरपडताळणी करून महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे प्रत्यक्ष पीकस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि पीकनुकसानीचे मूल्यांकन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. निकष पूर्ण होत असल्याचे फेरपडताळणीत स्पष्ट झाल्यास लांजा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची मागणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रस्ताव शासनाकडे सादर करताना लांजा तालुक्यातील प्रत्यक्ष पीकस्थितीचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील निवडणूक प्रक्रियेबाबत माध्यमांमध्ये समोर आलेल्या मुद्द्यांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या वृत्ताचा संदर्भ देत, दोन निवडणूक आयुक्तांनी विविध निर्णयांबाबत लेखी आक्षेप नोंदविल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामध्ये नवीन मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे किंवा पुनर्स्थापित करणे, फॉर्म-६ मधील बदल, मतदार यादीच्या आयटी प्रणालीचे केंद्रीकरण तसेच अपील प्रक्रियेशी संबंधित बाबींचा समावेश असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींची स्वतंत्र तपासणी करून संबंधित निर्णयप्रक्रिया, त्यावरील कार्यवाही आणि कारणमीमांसा पारदर्शकपणे जनतेसमोर आणावी, तसेच प्रक्रियात्मक किंवा वैधानिक त्रुटी आढळल्यास कायद्यानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पदाबाबतही निवेदनात घटनात्मक प्रक्रियेच्या चौकटीत मागणी मांडण्यात आली. एकीकडे शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष अडचणी आणि दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास यासारखे दोन वेगवेगळे, परंतु सार्वजनिक हिताशी संबंधित विषय घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दुष्काळाच्या बाबतीत वस्तुनिष्ठ फेरपडताळणी आणि निवडणूक प्रक्रियेच्या बाबतीत पारदर्शक चौकशी, या दोन्ही मागण्यांवर संबंधित यंत्रणांनी ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पदाधिकार्‍यांनी निवेदनात व्यक्त केली. यावेळी माजी उपसभापती सुभाष रामाणे, लांजा उपशहरप्रमुख प्रकाश गुरव, विभागप्रमुख लक्ष्मण मोर्ये, विश्वास मांडवकर, मंगेश जाधव, उपविभागप्रमुख शांताराम गुरव, राजेंद्र सुर्वे, अल्लाउद्दीन नेवरेकर, सुभाष तावडे, शाखाप्रमुख उमेश पडीलकर, वसंत गुरव, अनिल सोलकर, युवा अधिकारी अक्षय कुरूप, दिनेश गुरव, पुनस सरपंच संतोष लिंगायत आदी पदाधिकार्‍यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg