साटेली-भेडशी (प्रतिनिधी) : तिलारी प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी बंद होण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना झरेबांबर - काजुळवाडी येथील भंडारा नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधार्यात पाणी अडविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बंधारा बांधला, मात्र त्यात पाणी साठणार नसेल तर या बंधार्याचा उपयोग तरी काय? असा संतप्त सवाल शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे. तिलारी कालव्याच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने १ ऑक्टोबरपासून जवळपास तीन महिने दोन्ही कालव्यांमधून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नदी-नाले तसेच बंधार्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे.
गतवर्षी झरेबांबर-काजुळवाडी येथील भंडारा नाल्यावर सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला. परिसरातील अनेक शेतकर्यांच्या बागायती शेतीसाठी हा बंधारा महत्त्वाचा ठरणार असल्याची अपेक्षा होती. मात्र बंधार्याचे बांधकाम पूर्ण होऊनही पाणी अडविण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात न आल्याने शेतकर्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर नाल्यातील पाण्याचा प्रवाह कमी होऊन बंधारा कोरडा पडल्यास परिसरातील बागायती शेतीसमोर मोठे संकट उभे राहू शकते. आंबा, काजू तसेच अन्य बागायती पिकांना पाण्याची आवश्यकता असताना सिंचनाचा आधारच उपलब्ध न झाल्यास शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बंधार्यात पाणी अडविण्यासाठी योग्य व प्रभावी उपाययोजना करण्यात आल्यास कालव्याचे पाणी बंद असतानाही पुढील तीन-चार महिने बागायती शेतीला पाण्याचा आधार मिळू शकतो, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेळ न दवडता तातडीने बंधार्याची पाहणी करून पाणी अडविण्याची आवश्यक व्यवस्था करावी, अशी मागणी झरेबांबर-काजुळवाडी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.