loader
Breaking News
Breaking News
Foto

पितांबरी DSL-2026 स्पर्धेत दापोली सॉकर्स पुन्हा अजिंक्य! अंतिम सामन्यात इशान एफसीचा २-० गोलने पराभव

दापोली (वार्ताहर) : दापोली फुटबॉल क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पितांबरी दापोली सुपर लीग (DSL-2026) फुटबॉल स्पर्धेत दापोली सॉकर्स एफसीने पुन्हा एकदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. दापोली येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दापोली सॉकर्सने इशान एफसीचा २-० गोलने पराभव करीत दिमाखदार विजय मिळवला. या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये डॉ. मुनिर सरगुरो यांच्या नेतृत्वाखालील दापोली सॉकर्स, डॉ. रविंद्र टेटांबे यांचा इलेव्हन टायगर्स, डॉ. संजीव मदान यांचा इशान एफसी, हर्ष तोडणकर यांचा सनब्लिस स्ट्रायकर्स, स्वर्णिम हरवंदे यांचा दापोली टायटन्स एफसी आणि विनय पोतदार यांचा राणा एफसी या संघांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अंतिम सामन्यात दापोली सॉकर्सच्या विंगर झुहैर दाभोळकरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दोन गोल नोंदवले. त्याच्या शानदार कामगिरीमुळे दापोली सॉकर्सला विजेतेपद मिळवता आले. या कामगिरीसाठी झुहैरला अंतिम सामन्यातील 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरविण्यात आले. स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये गोल्डन बूटचा मान साहिल लोळगे, गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार अंकित शर्मा, बेस्ट डिफेंडर प्रज्वल, बेस्ट स्ट्रायकर अमान कुलाबकर, इमर्जिंग प्लेअर ओजस मेहता आणि बेस्ट मिडफिल्डर पुरस्कार जय म्हस्के यांना प्रदान करण्यात आला. तसेच संकेत मेहता पुरस्कृत इमर्जिंग गोलकीपर पुरस्कार रोशन बेलोसे याने पटकावला.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी हिमांशू किर्वे, संवेद झगडे, मिहिर झगडे, साहिल साळवी, स्मित तोडणकर, साकिब कासू, शार्दुल आंबेकर, फरहान कुलाबकर, अलिश साळगावकर, पार्थ कदम आणि रोहित जाधव यांच्यासह अनेक खेळाडूंनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दापोली फुटबॉल क्लबचे अध्यक्ष मिलिंद खानविलकर, उपाध्यक्ष ऋषिकेश मढव, सचिव विनोद म्हस्के आणि खजिनदार वरुण महाजन यांनी सहकार्य केले. दापोलीतील फुटबॉलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg