loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरात भाजपचा 'राष्ट्र चिंतन संवाद' उत्साहात संपन्न

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने गुहागर येथील भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेला “राष्ट्र चिंतन संवाद कार्यक्रम” उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. त्याचबरोबर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक, भाजपा नेते वैभव खेडेकर, माजी आमदार सूर्यकांत दळवी, गुहागरच्या नगराध्यक्ष नीताताई मालप, सर्व तालुकाध्यक्ष, विविध मोर्चांचे अध्यक्ष तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे यांनी उपस्थितांना संबोधित करत राष्ट्रहित, संघटनात्मक बळकटी, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले. राष्ट्रहिताच्या विचारांना बळ देणारा, संघटनात्मक एकतेचा संदेश देणारा आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा “राष्ट्र चिंतन संवाद कार्यक्रम” यशस्वीरित्या संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg