loader
Breaking News
Breaking News
Foto

डोंबिवलीतून दुष्काळग्रस्तांसाठी 51 लाखांचा निधी ,भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे व्यापारीवर्गाकडून धनादेश सुपूर्द

डोंबिवली ( प्रतिनिधी ): महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असताना डोंबिवलीतील व्यापारीवर्गाने सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डोंबिवलीत सामाजिक भान जपणाऱ्या दातृत्वाचा गरबा पहायाला मिळत आहे. नवरात्रौत्सवाचा बडेजाव आणि खर्च कमी करून तो निधी दुष्काळग्रस्तांना द्या, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला डोंबिवलीतील व्यापारीवर्गाने 51 लाखांची मदत करून साद दिली. डोंबिवलीतील प्रसिद्ध नमो रमो नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल 51 लाख रुपयांची निधी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचप्रमाणे नमो रमो नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांसाठी दिले. ही एकूण मदत 5 लाख इतकी आहे. मदतीचा हा ओघ इथेच थांबणार नसून नवरात्रीच्या अखेरच्या दिवसापर्यंत दुष्काळग्रस्तांसाठी हा मदतनिधी गोळा केला जाणार आहे. डोंबिवलीकरांच्या या उत्सव आणि सामाजिक भान यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.डोंबिवली क्रीडा संकुलात गेल्या अनेक वर्षांपासून नमो रमो गरब्याचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा गरबा म्हणून या गरब्याकडे पहिले जाते. विशेष म्हणजे याठिकाणी वातानुकुलित गरब्याचा आनंद गरबाप्रेमींना घेता येतो.

टाइम्स स्पेशल

दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी आपले एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षासाठी दिले. या वेतनाचा एकत्रित धनादेश भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सुपूर्द केला. यासोबतच भाजपा ठाणे विभाग प्रसिद्धीप्रमुख तथा नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी एक लाख रुपयांची अतिरिक्त मदत दिली.संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीला धावून जाणं ही आपल्या महाराष्ट्राची परंपराच आहे. याच भावनेतून भाजपा कल्याण-डोंबिवली परिवाराने दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg