loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड येथे ११ ऑक्टोबरपासून ’इंद्रधनू नवरात्र उत्सव’, २० ऑक्टोबरला रंगणार ’दांडिया नाईट विथ सेलिब्रिटी’

देवगड ( प्रतिनिधी) - इंद्रधनू देवगड (रजि.) आयोजित व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्याने ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत देवगड शहरातील कॉलेज रोडनजीकच्या पाटणकर कंपाऊंड (सारस्वत बँकसमोर) रात्री ९.३० वाजता नवरात्र उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. २० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता दांडिया नाईट विथ सेलिब्रिटी हा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला असून यात सुप्रसिद्ध गायक व ‘भारत का अमृत कलश’ विजेता सिद्धेश जाधव व सुप्रसिद्ध गायिका व सूर नवा ध्यास नवा फेम तृप्ती कुडाळकर हे कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती इंद्रधनू देवगड संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नवरात्र उत्सवात सहभागी होणार्‍या निवडक कलाकारांचा सन्मान संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे. यात लक्षवेधी चेहरा, बेस्ट स्माईट, बेस्ट कॉस्च्युम, इंद्रधनू इस्टा क्विन, इंद्रधनू इन्स्टा किंग, किंग ऑफ दांडिया नाईट, क्विन ऑफ दांडिया नाईट अशा प्रकारची विविध १२ बक्षीसे दररोज सलग नऊ दिवस देण्यात येणार आहेत अशी माहिती प्रसाद कुळकर्णी यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg