loader
Breaking News
Breaking News
Foto

परचुरी ग्रामदेवता मंदिरात चोरी; सीसीटीव्ही कॅमेर्‍यात अज्ञात चोरटा कैद

वरवेली (वार्ताहर) - तालुक्यातील परचुरी येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरातून सुमारे ३२ हजार रुपये किमतीचे दोन ऍम्प्लिफायर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी २६ सप्टेंबर रोजी रात्री ९.०५ ते ९.२६ वाजेच्या दरम्यान झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परचुरी भुवडवाडी, ता. गुहागर येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरात धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी ऍम्प्लिफायरचा वापर केला जातो. मंदिरातील दोन ऍम्प्लिफायर मशीन चोरीला गेले असून, त्यांची एकूण किंमत ३२ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा तक्रारदार रामचंद्र धोंडू आडविलकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री ९.०५ ते ९.२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने मंदिरातील दोन्ही ऍम्प्लिफायर चोरून नेल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्याच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरी करणार्‍या व्यक्तीची ओळख पटण्याची शक्यता असून, लवकरच संशयिताला ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल लुकमान सुजात तडवी यांच्यासह हेड कॉन्स्टेबल राजेश धनावडे, किशोर साळवी अधिक तपास करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg