loader
Breaking News
Breaking News
Foto

वायंगणतडमध्ये भाजप युवा मोर्चा आक्रमक! नव्या सिमेंट काँक्रिट रस्त्याला भेगा, खड्डे; अभियंत्याला घटनास्थळीच धरले धारेवर!

तिलारी प्रतिनिधी : वायंगणतड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याला भेगा पडल्या असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारावरून भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पराशर सावंत, प्रीतम पोकळे, लवू नाईक आणि ग्रामस्थ आज आक्रमक झाले. संबंधित अभियंत्याला घटनास्थळी नेऊन प्रत्यक्ष परिस्थिती दाखवत त्यांनी जाब विचारला.नवीन रस्ता असूनही भेगा आणि खड्डे कसे? असा सवाल उपस्थित करत पदाधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधित रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करून देण्याचे आश्वासन अभियंत्याने दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रीतम पोकळे यांच्या घराजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळेही नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांच्या ये-जा करण्यासाठी योग्य पर्यायी जागा न ठेवल्याने दोन वाहने समोरासमोर आली की वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच ठेकेदाराने पाईपलाईन फोडल्याने परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या समस्येची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अभियंत्याला त्याच ठिकाणी नेले. विशेष म्हणजे, अभियंता घटनास्थळी उपस्थित असतानाच दोन एसटी बस समोरासमोर आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे रस्त्याच्या कामाचे नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टाइम्स स्पेशल

रस्त्यावरील भेगा व खड्ड्यांची दुरुस्ती, पाईपलाईनची समस्या दूर करणे आणि नागरिकांसाठी सुरक्षित पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणे या मागण्यांवर भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घेतली.“जोपर्यंत रस्त्यावरील भेगा व खड्डे दुरुस्त होत नाहीत आणि नागरिकांना सुरक्षित पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला जात नाही, तोपर्यंत पुढील काम सुरू करू दिले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दिला.नव्याने झालेल्या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि सुरू असलेल्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे. अभियंत्याने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात किती लवकर उतरते आणि संबंधित कामांचा दर्जा सुधारतो का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg