loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

ठाणे (अमोल पवार) : ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि आशा स्वयंसेविका यांना 45,000 रुपयांचा दिवाळी बोनस बोनस घोषित करण्यात आला आहे. तर मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा ३३ हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी ३१ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कायमस्वरुपी अधिकारी व कर्मचाऱ्यांना, परिवहन सेवेतील तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. इतर महापालिकेच्या मानाने दरवर्षी कमी सानुग्रह अनुदान मिळत असल्याने यंदाही ठाणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुसरीकडे मीरा भाईंदर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षापासून ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यापेक्षा जादा सानुग्रह अनुदान देण्यात येतो. यावर्षी ३० हजार सानुग्रह अनुदानाची मागणी ठाणे महापालिका पालिका कर्मचारी संघटनेने केली होती. मात्र पालिका प्रशासनाने ती अमान्य केली. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कायमस्वरुपी अधिकारी व कर्मचाऱ्यांना, परिवहन सेवेतील तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शुक्रवारी केली. याशिवाय, आशासेविकांनाही प्रत्येकी सहा हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येईल. दिवाळीपूर्वी ही रक्कम बँक खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी जाहीर केल.

टाईम्स स्पेशल

ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याना गेल्या वर्षी २०२४-२५ मध्ये ही रक्कम २४ हजार ५०० सानुग्रह अनुदान देण्यात आला होता. ठाणे महापालिकेचे कायमस्वरूपी, कंत्राटी अशा ६, ६६२ कर्मचारी व परिवहन सेवेतील १,२८५ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तर ६७३ आशासेविकांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिवाळी विशेष भेट म्हणून देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर २० कोटी ११ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg