loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रलंबित देयकांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; रत्नागिरीत उच्चस्तरीय समिती आणि विशेष 'GR' ची मागणी

रत्नागिरी : प्रलंबित देयकांमुळे राज्यातील कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले असून, या निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरीतील कंत्राटदार संघटनेने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. प्रलंबित बिले आणि विविध समस्यांमुळे गेल्या अकरा महिन्यांत राज्यातील ९ कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा अत्यंत गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कंत्राटदारांच्या या प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी आणि विशेष शासन निर्णय प्रसिद्ध करावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनामार्फत सरकारकडे करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्रात जलजीवन मिशन आणि इतर शासकीय विभागांची मिळून जवळपास ८६ हजार कोटी रुपयांची कंत्राटदारांची देयके गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली आहेत. बिले वेळेवर न मिळाल्याने आणि शासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे कंत्राटदारांवर मोठा मानसिक आणि आर्थिक ताण येत आहे. महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेने यापूर्वी धरणे आंदोलने, मोर्चे आणि उपोषणांच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने अनेकदा आवाज उठवला. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. शासनाच्या या उदासीन धोरणामुळेच कंत्राटदारांना टोकाचे पाऊल उचलावे लागत असून, राज्यातील समस्त कंत्राटदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

टाईम्स स्पेशल

या पार्श्वभूमीवर, अधिक आत्महत्या रोखण्यासाठी, विकासकामे करणार्‍या कंत्राटदारांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने उच्चस्तरीय समितीची स्थापना करावी, अशी जोरदार शिफारस रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली. या वेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, राजापूर ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष अश्पाक हाजु, राजापूर स्थापत्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष किरण तुळसवडेकर यांच्यासह ओंकार गर्दे, बापू शिंदे, जयसिंग माने, सागर मांगले, अशरफ मुकरी, प्रशांत सावंत, मोहम्मद ठाकूर, उल्हास विचारे, भावेश नारकर, अजित पत्याणे, शिवा पवार, दामोदर चव्हाण आणि वंदन कांबळे हे शासकीय नोंदणीकृत ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg