loader
Breaking News
Breaking News
Foto

आ. किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा तालुक्यात पाण्याच्या दुष्काळमुक्तीसाठी तब्बल ११४५ ‘वनराई बंधारे’

केळंबे-लांजा, (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील भविष्यातील तीव्र पाण्याच्या दुष्काळ परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी तसेच भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या सूचनेनुसार आणि आमदार कीरण सामंत यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तालुक्यात जलसंधारणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत तालुक्यात ठिकठिकाणी तब्बल ११४५ ’वनराई बंधारे’ यशस्वीरित्या बांधण्यात आले असून, यामुळे तालुक्याला पाणीटंचाईतून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यंदा पाऊस कमी पडला असल्यामुळे भविष्यात पीण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार असल्याने येणा-या संकटावर मात करण्याची पाणी अडवा आणि जिरवा हा उपक्रम तालुक्यात राबवला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षी पेक्षा यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भिती लक्षात घेऊन, पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करून ते जमिनीत जिरवणे आणि पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार नियोजनबद्ध आराखडा आखून तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे बांधण्याचा विक्रम करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg