चिपळूण (सुशांत कांबळे ) : तालुक्यातील तोंडली परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास तोंडली मतेवाडी येथील श्री. चंद्रकांत महादेव मते यांच्या वाड्यातील गायीच्या नवजात वासरावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे.विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच तोंडली येथील कांबळे मधलीवाडी परिसरात बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार केले होते. या घटनेनंतर पुन्हा एकदा वासरावर हल्ला झाल्याने परिसरातील नागरिक आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ वाढत असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे, जनावरांची देखभाल करणे तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबतही नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन जखमी वासरावर उपचार करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच परिसरात बिबट्याचा वावर शोधण्यासाठी गस्त वाढवावी, पिंजरा लावण्यासह आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात आले असून आता वनविभागाने केवळ घटनांची नोंद न घेता ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा तोंडली ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.


































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.