loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू बॉम्बे कराटे क्लबच्या खेळाडूंची आशिया कप २०२६ व ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी

नवी मुंबई : अमेरिका-जपान कराटे असोसिएशन इंटरनॅशनल (AJKA-I) शी संलग्न न्यू बॉम्बे कराटे क्लब (NBKC) च्या खेळाडूंनी सन २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या Asia Cup 2026 तसेच All India Open Karate Championship 2026 या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये सहभागी होत उल्लेखनीय कामगिरी बजावली. देशभरातील तसेच विविध राज्यांतील उत्कृष्ट कराटेपटूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धांमध्ये न्यू बॉम्बे कराटे क्लबच्या खेळाडूंनी आत्मविश्वासाने सामने खेळत आपल्या कौशल्याची आणि मेहनतीची छाप पाडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विविध Kumite आणि Kata प्रकारांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत अनेक पदके मिळवून क्लबचे, पालकांचे आणि नवी मुंबईचे नाव अभिमानाने उंचावले. खेळाडूंच्या या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, शिस्त, कठोर सराव आणि पालकांचे सहकार्य यांचा मोठा वाटा आहे. स्पर्धात्मक स्तरावर खेळाडूंना तयार करण्यासाठी NBKC कडून नियमित प्रशिक्षणासोबतच स्पर्धेपूर्व तयारी, विशेष सराव आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते.

टाईम्स स्पेशल

न्यू बॉम्बे कराटे क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष रोहन यादव, अमेरिकन-जपान कराटे असोसिएशन इंटरनॅशनल इंडिया चे नॅशनल रिप्रेजेंटेटिव्ह योगेश कांबळी आणि न्यू बॉम्बे कराटे क्लबचे डायरेक्टर बिपिन राय यांनी सर्व विजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करताना सांगितले की, “पदक जिंकणे हा यशाचा एक भाग आहे; मात्र प्रत्येक स्पर्धेतून अनुभव घेऊन पुढील स्तरावर अधिक चांगली कामगिरी करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. NBKC मधील प्रत्येक खेळाडूला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.” या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. भविष्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आणखी मोठे यश मिळवण्याचा निर्धार न्यू बॉम्बे कराटे क्लबच्या खेळाडूंनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg