सावंतवाडी, (प्रतिनिधी) - सावंतवाडी मध्ये येत्या २७ डिसेंबर रोजी भव्य रनर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना क्रिडा क्षेत्रातील संधी शोधण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाचा घटक ठरत असल्याने या स्पर्धेला महत्त्व असून जिल्हा भरातील विद्यार्थी सहभागी झाले पाहिजेत म्हणून प्रयत्न केला जात आहे असे युवराज लखमराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वाढणारे शारीरिक आजार दूर करण्यासाठी तसेच युवकांमध्ये खेळाडू वृत्ती वाढविण्याच्या दृष्टीने सावंतवाडी येथील सिंधू रनर्स आणि स्पोर्ट्स फाउंडेशन, सावंतवाडी पॅलेस बुटीक आर्ट हॉटेल आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधू यंग चॅम्पियन्स रन’च्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन येत्या २७ डिसेंबर रोजी ऐतिहासिक सावंतवाडी राजवाडा येथे करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे युवराज तथा भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांनी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे आणि युवकांमधील लपलेली क्रीडा प्रतिभा शोधणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले असून यावर्षी साडेपाचशेच्या वर स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेत वयोगटानुसार चार धावण्याच्या श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये १६ ते १९ वयोगटासाठी १० किमी रन असून त्याचे रिपोर्टिंग सकाळी ५:३० वाजता व सुरुवात सकाळी ६:०० वाजता होईल, यासाठी ८५० रुपये शुल्क आहे. १३ ते १६ वयोगटासाठी ५ किमी रन असून रिपोर्टिंग सकाळी ६:०० वाजता व सुरुवात ६:३० वाजता होईल आणि शुल्क ७५० रुपये आहे. १० ते १३ वयोगटासाठी ३ किमी रन असून रिपोर्टिंग सकाळी ६:३० वाजता व सुरुवात ७:०० वाजता होईल, यासाठी ६५० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. तसेच ७ ते १० वयोगटासाठी १.५ किमी रन असून रिपोर्टिंग सकाळी ७:०० वाजता व सुरुवात ७:३० वाजता होईल, यासाठी ५५० रुपये शुल्क आहे.
सर्व नोंदणीकृत सहभागींना टी-शर्ट, पदक आणि पूर्णता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेदरम्यान पाणी व वैद्यकीय सुविधा आणि स्पर्धेनंतर अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. सहभागींनी www.Sindhurunners.com या संकेतस्थळावर अथवा जाहिरात पोस्टरवरील क्यूआर (QR) कोडद्वारे ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करायची आहे. अधिक माहितीसाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील “Sindhu_Runners_07” या पेजला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीची अंतिम तारीख ५ डिसेंबर २०२६ असून पालकांनी लवकरात लवकर आपल्या मुलांची नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी सिंधू रनर्सच्या डॉ. स्नेहल गोवेकर, सुप्रिया मोडक, जॉन्सन फर्नांडिस, शिवम घोगळे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम तरुण खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची आणि क्रीडाक्षेत्रात भविष्य घडवण्याची उत्तम संधी आहे. सर्व तरुण धावपटूंनी या रोमांचक दिवशी सहभागी होऊन धावण्याचा आनंद अनुभवावा, असे सिंधू रनर्स टीमने कळवले आहे.



































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.