loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर पंचायत समितीमध्ये "माझं गाव, आरोग्य संपन्न गाव"कार्यशाळा संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर पंचायत समिती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात "माझं गाव, आरोग्य संपन्न गाव"कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बारगोडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.सत्यार्थप्रकाश बळवंत आणि पंचायत समिती सदस्य यांनी दीप प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी प्रस्तावना मांडली.अभियान संदर्भात सादरीकरण केले. अभियानाचे उद्दिष्ट, ध्येय, सर्व विभागाचे सक्रिय सहभाग,जबाबदारी, कृती दल समिती, पुरस्कार, अभियान अंतर्गत तालुक्यातील ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र मूल्यांकन सद्यस्थिती या बाबत सविस्तर माहिती उपस्थित सर्व सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी आणि पंचायत समिती विविध विभागाचे खातेप्रमुख यांना दिली.

टाईम्स स्पेशल

कार्यशाळेला तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश आमटे यांनी कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सचिन चौगुले, अक्षय गावडे, राजेश जाधव, श्रद्धा पवार, पूजा ससाणे तसेच पंचायत समिती आणि तालुका आरोग्य विभागातील स्त्री परिचर आणि पुरुष परिचर यांनी मेहनत आणि परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg