loader
Breaking News
Breaking News
Foto

देव्हारे अंगणवाडी सेविका ऐश्वर्या कंचावडे यांचा सेवा संकल्प अभियानांतर्गत सन्मान

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील देव्हारे दक्षिणवाडी येथील अंगणवाडी सेविका ऐश्वर्या कंचावडे या बालकांच्या शैक्षणिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अभिजीत देवळेकर म्हणाले, “अंगणवाडी सेविका बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत मोलाचे योगदान देतात. बालकांच्या आयुष्यातील सुरुवातीची वर्षे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाची असतात. ऐश्वर्या कंचावडे या बालकांशी आपुलकीने संवाद साधून त्यांच्या प्रगतीकडे सातत्याने लक्ष देत आहेत. त्यांच्या सेवाभावी कार्याचा सन्मान केल्याने त्यांना आणखी उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.” कार्यक्रमादरम्यान अभिजीत देवळेकर यांनी अंगणवाडीतील बालकांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी बालकांच्या शैक्षणिक प्रगतीची तसेच त्यांच्या आवडी-निवडीची माहिती जाणून घेत त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी उपस्थित बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमामुळे अंगणवाडीतील बालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अंगणवाडी सेविकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या कार्याचा सन्मान केल्याने त्यांना अधिक उत्साहाने आणि समर्पणाने काम करण्याची प्रेरणा मिळते, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg