loader
Breaking News
Breaking News
Foto

मिनी नरकासुर गटात हौशी कलाकार मित्रमंडळाची बाजी; फ्रेंडस् सर्कलच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवगड (प्रतिनिधी) - फ्रेंडस् सर्कल, देवगड सडा यांच्यावतीने फ्रेंडस् सर्कल नाका, देवगड येथे शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या भव्य नरकासुर स्पर्धेत खुल्या गटात सप्तरंगी मित्रमंडळ, देवगड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर मिनी नरकासुर गटात हौशी कलाकार मित्रमंडळ, देवगड किल्ला यांनी प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. स्पर्धेत दोन्ही गटांत मिळून १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धकांसह नागरिकांचाही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक नितीन बांदेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तर कार्यक्रमस्थळाचे उद्घाटन राज तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे आरोग्य व स्वच्छता सभापती बुवा तारी, नगरसेवक संतोष तारी, फ्रेंडस् सर्कलचे शेखर सावंत, प्रदीप सावंत, प्रवीण खडपकर, विकास गावडे, नितीन आळवे, प्रकाश प्रभू, शेखर कुबल, उमेश बिडये, मिलिंद कुबल, प्रवीण सावंत, परीक्षक महेश लोके, अनिकेत पेडणेकर, काकडे आदी उपस्थित होते. खुल्या गटातील स्पर्धेत सप्तरंगी मित्रमंडळ, देवगड यांनी प्रथम क्रमांक पटकावत रोख १२ हजार रुपये व सन्मानचिन्ह मिळविले. नवयुवक मित्रमंडळ, जामसंडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत रोख ८ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर आझादनगर मित्रमंडळ, जामसंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवत रोख ४ हजार रुपये व सन्मानचिन्ह पटकाविले.

टाईम्स स्पेशल

मिनी नरकासुर गटात हौशी कलाकार मित्रमंडळ, देवगड किल्ला यांनी प्रथम क्रमांक मिळवत रोख १ हजार ५०० रुपये व सन्मानचिन्ह पटकाविले. दुर्वांकूर दळवी यांनी द्वितीय क्रमांक मिळवत रोख १ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर भूषण वालकर यांनी तृतीय क्रमांक मिळवत रोख ५०० रुपयांचे पारितोषिक मिळविले. तसेच बेस्ट एन्ट्रीचा मान साई हर्ष मित्रमंडळ, जामसंडे यांना मिळाला. त्यांना रोख १ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. खुल्या गटात एकूण १२, तर मिनी नरकासुर गटात ५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षण महेश लोके व अनिकेत पेडणेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

देवगडच्या नरकासुर स्पर्धेत सप्तरंगी मित्रमंडळ अव्वल!

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg