केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील दुर्गम, निसर्गरम्य आणि ’मिनी महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळ गावाच्या इतिहासात उद्या, १ नोव्हेंबर रोजी एक सोनेरी पान जोडले जाणार आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल ७९ वर्षांनी माचाळ गावामध्ये पहिल्यांदाच राज्य परिवहन मंडळाची (एसटी) लालपरी धावणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि एसटीचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण माचाळ गावामध्ये दिवाळीसारखा जल्लोष आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे.
माचाळ हे गाव समुद्रसपाटीपासून उंच हवेचे ठिकाण असून ते पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, भौगोलिक दुर्गमता आणि रस्त्यांची व्यवस्था नसल्यामुळेच आजवर या गावातील ग्रामस्थांना पायपीट करावी लागत होती किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. गावाला हक्काची दळणवळण सेवा मिळावी, यासाठी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून एसटी प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून माचाळसाठी हंगामी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्या १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता लांजा बसस्थानकातून माचाळ गावाकडे जाण्यासाठी बस सोडण्यात येणार आहे. गावात बसचे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि पारंपरिक पद्धतीने बसचे व चालक-वाहकांचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. एसटी बस सुरू झाल्यामुळे केवळ माचाळवासीयांचीच सोय होणार नाही, तर पर्यटकांनाही आता ’मिनी महाबळेश्वर’ असलेल्या माचाळला भेट देणे सोपे होणार आहे. यामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळून गावाची आर्थिक प्रगती होईल, असा विश्वास ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. एसटीच्या या ऐतिहासिक फेरीमुळे माचाळ गावाचा वनवास संपल्याची भावना सध्या तालुक्यात व्यक्त होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.