loader
Breaking News
Breaking News
Foto

महामार्गावरील चिपळूणचा उड्डाणपूल ३० नोव्हेंबर पूर्वी सुरु होणार? युद्धपातळीवर काम सुरु! वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार!!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - बहुप्रतीक्षित असलेल्या पनवेल-कन्याकुमारी महामार्गांवरील चिपळूण शहरातील उड्डाणपूल ३० नोव्हेंबर पूर्वी सुरु होणार असल्याची माहिती थेट उड्डाणंपूलावर सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणाहून मिळत आहे. प्रांत कार्यालयाकडील डांबरीकरण सुरु असून, छोटी वाहने ३० पूर्वी देखील सोडण्यात येतील, असे सांगण्यात आले. ३० नोव्हेंबरला मुंबईकडून रत्नागिरीकडे जाणारी लेन सुरु होईल, असे सांगण्यात आले. उड्डाणंपूलावरील विद्युत खांब, दिव्यांसह सज्ज असून फक्त इलेक्ट्रिसिटी जोडणीचे काम बाकी असल्याचे सांगण्यात आले. उड्डाणंपूलावरून वाहतूक सुरु झाल्यावर शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. बहुप्रतीक्षित असलेला उड्डाणपूल सुरु होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg