सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे संपूर्ण भांडवल आणि उत्पादन खर्च वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यासह आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे व खते विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत, या मुख्य मागणीसाठी भारतीय किसान संघातर्फे सावंतवाडी तालुका स्तरावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. राज्यात यंदा पावसाचे अत्यंत असमान वितरण झाल्यामुळे अनेक भागात खरीप पिके वाळून गेली आहेत. पिकांचे उत्पादन न मिळाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उघड्यावर पडला आहे. त्यामुळे केवळ नियमानुसार मिळणारी नेहमीची भरपाई पुरेशी ठरणार नसून, विशेष आपत्कालीन निधीतून तातडीने मदत मिळावी, असा सूर निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
खरीप हंगामातील बुडालेल्या भांडवलासाठी आपत्कालीन निधीतून शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT द्वारे तातडीने प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत वर्ग करण्यात यावी. रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे भांडवल शिल्लक नसल्याने बियाणे, रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि आवश्यक कृषी निविष्ठांचा गाव पातळीवर विनामूल्य पुरवठा केला जावा. खरीप पिकांच्या वसुलीस त्वरित स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करावे. नवीन रब्बी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि आपत्ती काळ संपेपर्यंत व्याजाची आकारणी थांबवावी. कर्जमाफी योजनेतील प्रोत्साहन अनुदान नियमित व थकबाकीदार सर्व शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत तातडीने वितरीत करण्यात यावे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, छावण्या, रोजगार हमी योजना आणि जलसंधारणाची कामे प्राधान्याने सुरू करण्यात यावीत.
या आंदोलनात भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग हळदणकर, जिल्हा मंत्री अभय भिडे, जिल्हा सहमंत्री मनोहर ठिकार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सखाराम नाईक, प्रवीण परब, ग्राम समिती पदाधिकारी मुकेश ठाकूर, रूपेश परब, अभिजित सावंत, चंद्रकांत सावंत, प्रशांत कांबळी, देविदास गवंडे, रूपा सावंत, पुरुषोत्तम कासार यांच्यासह विविध गावांतील ग्रामसभेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.