loader
Breaking News
Breaking News
Foto

भरधाव ईर्टिगा कारचा भीषण अपघात; चालक ठार, सहा जण गंभीर जखमी

संगलट (इक्बाल जमादार) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वहूर गाव हद्दीत भरधाव ईर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारने रस्त्याकडेला केबल टाकण्याचे काम करणार्‍या दोन कामगारांना धडक दिली आणि त्यानंतर शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोव्याहून मुंबई-विरारच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी ईर्टिगा कार (क्र. एमएच ४८ एस ८८१०) बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास वहूर गाव हद्दीत आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर कारने रस्त्याकडेला स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने केबल टाकण्याचे काम करणार्‍या कामगारांना जोरदार धडक दिली आणि शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात कार चालक जमील शेख याचा जागीच मृत्यू झाला.

टाईम्स स्पेशल

कारमधील आरिफ रईस खान (४९), संतोष सुधाकर पाटील (३०), मोहम्मद आसिफ मोहम्मद हुसेन चौधरी (३०) आणि मोहम्मद रफीक युसूफ झवेरी (५०), तसेच केबल टाकण्याचे काम करणारे सुनील मंगल सिंग पंधराम (२१) आणि खुन्नू बलहारी सेलू (३४) हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg