loader
Breaking News
Breaking News
Foto

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्नीक घेतले श्री देवी काळकाई मातेचे दर्शन; भक्तिभावाने केली आरती

खेड (प्रतिनिधी) - श्री देवी काळकाई मातेच्या दर्शनासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्नीक उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अत्यंत भक्तिभावाने श्री देवी काळकाई मातेची आरती केली आणि देवीच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या दर्शनावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही देवीचे दर्शन घेतले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्नीसमवेत काळकाई मातेच्या मंदिरात जाऊन विधिवत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्रद्धापूर्वक आरतीमध्ये सहभाग घेत देवीची पूजा केली. देवीच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी आशीर्वाद घेतले. त्यांच्या उपस्थितीमुळे यावेळी मंदिर परिसरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अण्णा कदम, सचिन धाडवे, मानसी जगदाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्यासह विविध पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनीही श्री देवी काळकाई मातेचे दर्शन घेत धार्मिक विधींमध्ये सहभाग नोंदवला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या या दर्शनप्रसंगी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. देवीच्या आरतीने आणि जयघोषाने परिसरातील वातावरण धार्मिक रंगात न्हाऊन निघाले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे देवीचे दर्शन घेतले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg