loader
Breaking News
Breaking News
Foto

मुचरी गावातील ग्रामस्थांचा समाजासमोर आदर्श निर्माण करणारा कौतुकास्पद उपक्रम, ‘मिशन बंधारे’चा जलसंकल्प!

चिपळूण (ओंकार रेळेकर) - दुष्काळाच्या झळा आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गावाने जलसंधारणासाठी पुढाकार घेतला आहे. ‘लोकसहभागातून पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र घेऊन मुचरी ग्रामपंचायत आणि उत्कर्ष तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन बंधारे’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ गवळीवाडीतून करण्यात आला. गावातील १२ वाड्यांमध्ये लोकसहभागातून बंधारे उभारून पावसाचे पाणी अडविण्याचा आणि जमिनीत जिरविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष ग्रामसभेतील निर्णयाला कृतीची जोड म्हणून मुचरी गावातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासह भूजलपातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने चार दिवसांपूर्वी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांवर चर्चा करून लोकसहभागातून बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत ‘मिशन बंधारे’ उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg