loader
Breaking News
Breaking News
Foto

पारमार्थिक सेवा प्रतिष्ठानच्या गुहागर शाखेचा वर्धापन दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा

वरवेली (गणेश किर्वे) - पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान, पुणे शाखा गुहागरच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम ह.भ.प. प्रकाश महाराज सोलकर यांच्या निवासस्थानी पार पडले. यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी नवव्या अध्यायाचे पारायण ह. भ. प. रमेश महाराज बारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, रघुनाथ महाराज बारगोडे, अमोल महाराज वनगे व सहकाऱ्यांच्या सहभागाने भक्तिमय वातावरणात पार पडले. पारायणानंतर हरिपाठ व चक्री प्रवचन सेवा आयोजित करण्यात आली. यामध्ये भावेश माऊली शिंदे, ह. भ. प.एकनाथ महाराज मोरे आणि विजय महाराज माळी यांनी प्रवचन सेवा केली. त्यानंतर युवा कीर्तनकार ह. भ. प. प्रवीण महाराज मुळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पारमार्थिक सेवा प्रतिष्ठानच्या गुहागर शाखेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला उद्योजक सुदीप संसारे, पत्रकार गणेश किर्वे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी मागील तीन वर्षांमध्ये गुहागर शाखेच्या कार्यकारिणीने केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. नामयज्ञ सोहळा, बालसंस्कार शिबिर तसेच प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांना सहकार्य करणारे ज्येष्ठ वारकरी मंगेश खटाटे, बबन महाराज कुंभार संतोष महाराज भुवड, निलेश महाराज पारदळे, दत्ताराम महाराज यांच्यासह सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पारमार्थिक सेवा प्रतिष्ठानच्या कार्याची व गुहागर शाखेच्या वाटचालीची माहिती शाखाध्यक्ष ह.भ.प. श्रीमती रियामाई भुवड यांनी उपस्थितांसमोर मांडली.

टाईम्स स्पेशल

प्रतिष्ठानच्या आगामी विविध आध्यात्मिक, सामाजिक व संस्कारक्षम उपक्रमांना गुहागरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन ह. भ. प. प्रवीण महाराज मुळे यांनी केले. पत्रकार गणेश किर्वे यांनी यावेळी प्रतिष्ठानचे गुरुवर्य ह. भ. प. प्रकाश महाराज सोलकर यांच्या कार्यामागे समाजाने कायम सहकार्याने उभे राहावे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे नियोजन गुरुवर्य ह. भ. प. प्रकाश महाराज सोलकर यांनी केले. त्यांनी पारमार्थिक सेवा प्रतिष्ठानच्या कार्याची तसेच आगामी वाटचालीची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी इंद्रायणी मातेची आरती घेण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg