loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी

दापोली (प्रतिनिधी) : दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष या विभागातर्फे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन दापोली शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर यांनी दीप प्रज्वलन करून केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. विनोद जोशी, संचालक रवींद्र कालेकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. घनश्याम साठे, महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. श्रद्धा खुपटे, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉ. पल्लवी चव्हाण आणि त्यांच्या सहकारी डॉक्टर्स, इंटर्न्स इ. उपस्थित होते. या शिबिरामध्ये विद्यार्थिनींची वजन, उंची, ब्लड प्रेशर इ. ची तपासणी करण्यात आली. विद्यार्थीनींना नेहमी जाणवणाऱ्या तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारीसंबंधीही विद्यार्थिनींनी आलेल्या डॉक्टर्स आणि इंटर्न यांच्याशी चर्चा केली आणि सल्ला घेतला. या शिबिरासाठी दापोली होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या डॉ. पल्लवी चव्हाण, डॉ. माधुरी साठे, डॉ वैशाली वैशंपायन, डॉ. अमृता होन, डॉ. शबनम मुकादम, डॉ. मनाली बारटक्के, डॉ. पायल लवाटे ह्या डॉक्टर्स आणि 15 इंटरनी डॉक्टर्स यांनी विद्यार्थिनींची तपासणी केली.

टाईम्स स्पेशल

ज्या विद्यार्थिनींना पुढील तपासणीसाठी आवश्यकता आहे त्यांच्यासाठी डॉ. जोशी यांनी मदत केली. अशा 15 विद्यार्थिनींचे रक्त सखोल चाचण्या करण्यासाठी लॅब मधे पाठवण्यात आले. या शिबिराचा लाभ महाविद्यालयाच्या 135 विद्यार्थिनी आणि 14 प्राध्यापिका यांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. श्रद्धा खुपटे यांच्यासह प्रा. सिद्धी साळगावकर, प्रा. जान्हवी दिवेकर, प्रा. श्वेता ओक कीर्ती परचुरे तसेच कार्यालय परिचर सूरज बुरटे, सणस यांनी मेहेनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg