loader
Breaking News
Breaking News
Foto

तांबळडेग येथे ‘मुक्तद्वार सागर वाचनालय’चा ९७ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात

देवगड (प्रतिनिधी) - तांबळडेग येथील ‘मुक्तद्वार सागर वाचनालय (रजि.)’ चा ९७ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. यानिमित्त वाचनालयाच्या प्रांगणात काढलेली सुंदर व सुबक रांगोळी उपस्थितांचे आकर्षण ठरली. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई आणि पणत्यांच्या तेजोमय प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वर्धापन दिनाचे औचित्य साधून गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आले. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत मोलाचे योगदान देऊन आज आपल्यात नसलेल्या सर्व दिवंगत माजी पदाधिकाऱ्यांचे स्मरण करत त्यांच्याप्रती भावपूर्ण शब्दांत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. बुवा प्रमोद सनये, विवेक राजम, तुकाराम मोंडकर यांच्या सुमधुर आवाजात सदाबहार गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष दिगंबर येरागी, सचिव विद्या कोळंबकर, नरेंद्र राजम, अंतर्गत हिशोब तपासणीस विष्णू धावडे, आनंद राजम, डॉ.किर्ती राजम, सुलक्षणा राजम, सुलोचना राजम, ग्रंथपाल भावना मालंडकर, वर्षा राजम, समृद्धी धुरी, आकांक्षा सारंग, राजेंद्र येरागी, माधवी प्रभू, गंगाधर निवतकर, सचिन राजम आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg