चिपळूण (संतोष पिलके) - चिपळूण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने आमदार शेखर निकम यांच्या विशेष प्रयत्नांतून अर्थसंकल्पीय तरतुदीअंतर्गत मंजूर झालेल्या तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचा भूमिपूजन समारंभ सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. या कामांसाठी एकूण ६ कोटी ८३ लाख रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली असून, यामुळे चिपळूण परिसरातील रस्ते व पुलांच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन आ. शेखर निकम यांच्या हस्ते पार पडले. या विकासकामांमध्ये चिपळूण–गुहागर बायपास रोडचे मजबुतीकरण व डांबरीकरण, पिंपळी–नांदिवसे रस्त्याची सुधारणा आणि पेढांबे येथील मोठ्या पुलाची पुनर्बांधणी या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी चिपळूण–गुहागर बायपास रोडच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. त्यानंतर पिंपळी–नांदिवसे रस्ता सुधारणा व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कामासाठी ९२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होण्याबरोबरच स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनचालकांना या रस्त्याचा लाभ होणार आहे. दुपारी पेढांबे येथील मोठ्या पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण कामासाठी तब्बल ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सक्षम होण्यास मदत होणार असून, नागरिकांची अनेक वर्षांची गरज पूर्ण होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय तरतुदीअंतर्गत या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. मतदारसंघातील ग्रामीण तसेच शहरी भागातील रस्ते, पूल आणि अन्य पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. केवळ विकासकामांना मंजुरी मिळवून न थांबता ती प्रत्यक्ष मार्गी लागावीत, यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू असल्याचे या कामांमधून दिसून येत आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, सभापती सूर्यकांत खेतले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, ज्येष्ठ नेते दादा साळवी, उपसभापती संदेश आयरे, भाजपा गटनेते शशिकांत मोदी, नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, सौ. अंजली कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलींद कापडी, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, आरोग्य समिती सभापती शुभम पिसे, भाजपा चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, नगरसेविका सौ. राणी महाडिक, सौ. रुही खेडेकर, नरेंद्र बेलवलकर, रियाज खेरटकर सचिन भोसले, सचिन पाटेकर, सलीम पालोजी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, माजी सभापती शौकत मुकादम, पांडुरंग माळी, स्वप्नील शिंदे, दिशा दाभोळकर, डॉ. रेहमत जबले, रविना गुजर, पूनम भोजने, दिनेश शिंदे, ठेकेदार गणेश कांबळे, रोहित कांबळे, माजी नगरसेवक तथा ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर, ऍडव्होकेट अमित कदम, नगरसेवक योगेश पवार, इम्रान कोंडकरी आदी उपस्थित होते. या विकासकामांमुळे चिपळूण परिसराच्या दळणवळण व्यवस्थेला बळकटी मिळणार असून, आगामी काळात नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच, ६ कोटी ८३ लाख रुपयांच्या तीन महत्त्वपूर्ण विकासकामांच्या भूमिपूजनामुळे चिपळूणच्या विकासाच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.