loader
Breaking News
Breaking News
Foto

भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश; विनोद कदम यांची कामगार संघाच्या उपाध्यक्षपदी, तर महेश सावंत व सुशांत जाधव यांची संघटक सचिवपदी नियुक्ती

वेळणेश्वर उमेश शिंदे : शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कामगार क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या श्री. विनोद बबन कदम, श्री. महेश महादेव सावंत आणि श्री. सुशांत बबन जाधव यांना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या (संलग्न : ऑल इंडिया भारतीय कामगार सेना महासंघ) वतीने श्री. विनोद बबन कदम यांची उपाध्यक्षपदी, तर श्री. महेश महादेव सावंत आणि श्री. सुशांत बबन जाधव यांची संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष श्री. सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सरचिटणीस श्री. गोविंद मोहिते यांनी या नियुक्त्यांची अधिकृत पत्रे जारी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या तिन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची इच्छा आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या हस्ते आणि समाजातील प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रे स्वीकारण्याची होती. त्यानुसार चिपळूण येथील शिवसेना संपर्क कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार श्री भास्करराव जाधव यांच्या हस्ते तिन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.यावेळी मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही अनेक वर्षांपासून कामगार क्षेत्रात कार्यरत आहोत. मात्र, यापूर्वी ज्यांच्यासोबत काम केले, त्यांच्याकडून आम्हाला कधीही योग्य संधी मिळाली नाही. ती संधी आमदार भास्करराव जाधव साहेबांनी दिली. त्यांनी केवळ आश्वासन दिले नाही, तर दिलेला शब्द प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी दिलेली प्रत्येक आश्वासने पूर्ण केल्याचा अनुभव आम्हाला आला आहे. त्यामुळे यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करून कामगारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही तिन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

यावेळी आमदार श्री. भास्करराव जाधव म्हणाले की, "गेल्या ४० वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना समाजातील सर्व छोट्या-मोठ्या घटकांना न्याय देण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला आहे. कोणत्या समाजाची संख्या किती आहे, याचा विचार न करता त्या समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जात, पात किंवा धर्म न पाहता त्याला संधी देण्याची भूमिका मी नेहमीच घेतली. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. भविष्यात आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे. विनोद कदम, महेश सावंत आणि सुशांत जाधव यांच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि सोडवले जातील. त्यासाठी माझे त्यांना कायम सहकार्य राहील."या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख श्री. सुभाष जाधव, चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन श्री. मोहनशेठ मिरगल, नगरसेवक श्री. फैसल कास्कर, श्री. विकी नरळकर यांच्यासह चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील समाजातील प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg