loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी एसआरके तायक्वांदो क्लबचे खेळाडू रवाना

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो (१४ व १९ वर्षांखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ चे आयोजन दि. २ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, अकोट, जिल्हा अकोला येथे करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी येथील मारुती मंदिर परिसरातील एसआरके तायक्वांदो क्लबच्या सार्थक सुरत चव्हाण व मृण्मयी मंदार वायंगणकर या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. हे दोन्ही खेळाडू दि. १ नोव्हेंबर रोजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अकोल्याकडे रवाना झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, एसआरके तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य प्रफुल्ल हतिसकर तसेच समस्त पालकवर्ग यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी व पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg