loader
Breaking News
Breaking News
Foto

शांताराम लाखण यांचे दुःखद निधन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील गोविळ गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, यशस्वी व्यावसायिक शांताराम गणपत लाखण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षाचे होते. शांताराम लाखण यांनी आपल्या कष्टाच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर व्यवसायात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या गावातील व्यवसायासोबत गावातील विविध सामाजिक, धार्मिक, आणि सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीच्या स्वभावामुळे गावात आणि पंचक्रोशीत त्यांना विशेष आदराचे स्थान होते. विद्यादीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. एस. लाखण यांचे ते वडील होत. त्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg