loader
Breaking News
Breaking News
Foto

संतांनी जे लिहून ठेवले ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वासुदेवाच्या रूपातून प्रबोधन - गणेश वायकर

देवळे (प्रकाश चाळके) - वासुदेव ही परंपरा शिवकाळापासून सुरू असून एकनाथ महाराज पैठणकर यांनी ही वासुदेव प्रथा व परंपरा चालू केली. हीच परंपरा पुढे शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेरगिरीसाठी उपयोगात आली. बहिर्जी नाईक यांनी वासुदेवांच्या रूपात अनेक वेळा गुप्तहेरगिरी केली. वासुदेव हे बरीचशी माहिती गोळा करून धर्म जगवण्यासाठी बहिर्जी नाईकांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे असे मळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथील वासुदेव परंपरा टिकवणारे आणि टिकवण्यासाठी प्रयत्न करणारे गणेश राजू वायकर, राजू ज्ञानेश्वर घाडगे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वासुदेव ही कला व परंपरा सध्या लोप पावत चालली असल्याचे दुःखही त्यांनी व्यक्त केले. ही परंपरा टिकवण्यासाठी व समाजप्रबोधनाचे कार्य करण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे राजू वायकर यांनी सांगितले. समाजाचा आमच्यासारख्या खऱ्या वासुदेवांकडेही बघण्याचा दृष्टिकोन सध्या बदलला आहे. याचं कारणही तसेच असल्याचे म्हणत समाजात अनेक लपंगे, चोरी, लांडी लबाडी, करणारे अनेक लोक असल्याने त्यांच्यामुळे आमच्या पारंपारिक वासुदेव परंपरेलाही त्रास होतो. यात समाजाचा दोष नसून सध्याची परिस्थिती कारणीभूत असल्याचे वासुदेव गणेश वायकर व राजू घाडगे यांनी म्हटले.

टाईम्स स्पेशल

एकनाथ महाराज पैठणकर यांनी चालू केलेली ही वासुदेव प्रथा. या प्रथेमध्ये बारा बलुतेदार असून यामध्ये गोंधळी, पिंगळा, नंदीबैल, ज्योतिषशास्त्र, पोतराज, देवी वाले, मरीआई, वासुदेव, मनकवडी, नाथपंथी, बहुरूपी व तेलभुते असे 12 प्रकार असल्याचेही गणेश वायकर व राजू घाडगे यांनी सांगितले. एकनाथ महाराज पैठणकर यांनी चालू केलेली ही परंपरा व प्रथा पुढे चालावी यासाठी गेल्या तीन पिढ्यापासून आमचे घराणे प्रयत्न करत आहेत. समाजाने साथ दिल्यास धर्म जगवण्यासाठी व प्रबोधनासाठी आम्ही व आमची पुढची पिढी सुद्धा हे कार्य चालू ठेवील, असे त्यांनी म्हटले. शिवकाळात आमच्या या बहुरूपी प्रथेने एकनाथ महाराज पैठणकर यांच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांच्या धर्मरक्षणाच्या कार्याला हेरगिरीचे काम करून आमच्या पिढीने हातभार लागल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg