खेड - खेड तालुक्यातील आंबये येथे असलेल्या वृद्धाश्रमात कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात गोल्डन मेमरीज च्या सदस्यांनी एकाहून एक सुरेल आणि मनमोहक गीते सादर केली. या संगीतमय कार्यक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, गीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांना आपलेपणाची जाणीव व्हावी आणि त्यांच्या आयुष्यातील एकाकीपणा दूर होऊन त्यांना विरंगुळा मिळावा, या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिवलग या व्हॉट्स अप ग्रुपच्या सदस्यांनी या अनोख्या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीचे आयोजन केले होते.
प्रत्येक वृद्धाशी व्यक्तिगत संवाद साधताना त्यांची ओळख करून घेतली नंतर योग प्रशिक्षक डॉ वैष्णवी पाटील यांनी संवाद साधला.आपल्या छोटेखानी भाषणातून आत्मविश्वास आणि मानसिक तंदुरुस्ती कशी ठेवता येईल याबाबत छान टिप्स दिल्या.त्यानंतर गाण्यांच्या सुरेल मैफलीत वृद्ध नागरिकही रमून गेले. काही ज्येष्ठ नागरिकांनी संगीताच्या तालावर ठेका धरत नृत्याचा आनंद घेतला. वयाचे बंधन बाजूला ठेवून त्यांनी मनसोक्त आनंद लुटला. या अनोख्या संगीत सोहळ्यामुळे वृद्धाश्रमातील वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भारून गेले. कार्यक्रमादरम्यान वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा उपक्रमांमुळे आपल्याला आनंद मिळतो, मन प्रसन्न होते आणि आपुलकीच्या वातावरणात काही क्षण घालवण्याची संधी मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या नातेवाईकांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छाही दिल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या उपक्रमाला खेडचे मुख्याधिकारी महादेवराव रोडगे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉक्टर विलास शेळके डॉक्टर वैदेही शेळके यांनी ही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जपत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंददायी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उत्तम कुमार जैन समीर सावंत, प्रवीण छपरे, श्याम शिर्के, आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळणे आवश्यक असून, त्यांच्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असल्याची भावना या कार्यक्रमातून व्यक्त झाली. वृद्धाश्रमातील नागरिकांना आनंदाचे क्षण मिळावेत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि त्यांना समाज आपल्या पाठीशी असल्याची जाणीव व्हावी, यासाठी भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे उत्तम कुमार जैन यांनी यावेळी सांगितले. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा संगीत सोहळा ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.