loader
Breaking News
Breaking News
Foto

चतुरंग विचार मंचाच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान

खेड (प्रतिनिधी) - नवरात्रीमध्ये देवीच्या उत्सवाचा जागर केला जातो. देवीची आराधना केली जाते. सर्वत्र भक्तीमय वातावरण असते. याच उत्सवा दरम्यान चतुरंग विचार मंच खेड रत्नागिरी यांच्या वतीने अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला. खेड तालुक्यात ग्रामीण भागात कार्यरत असणार्‍या महिला शिक्षकांचा नवदुर्गा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून सर्वच महिला आपले काम करत असतात मात्र नवरात्रीमध्ये परतून स्वरूपात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शिक्षिकांचा सन्मान करण्याचे हे चतुरंगचे २ रे वर्ष आहे. या वर्षी दीप्ती दिलीप यादव शाळा - माणी नं.१, सविता माणिक सुतार - चिंचघर मेटकर डाऊल, मीनल मोहन कदम - शाळा कळंबणी नं.२, मीनल खेडेकर शाळा - सुकदर, माधुरी प्रशांत खेडेकर शाळा - जामगे शिंदे, तृप्ती घोटणे शाळा - कोतवली नं.२, प्रतिभा देशमाने, सई संदेश म्हापदी - शाळा साखर नं.२, या शिक्षकांचा शाल श्रीफळ मानचिन्ह सन्मानपत्र व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. यासाठी चतुरंग विचार मंचचे परेश खोपडे, दिनेश पवार, मंगेश झावरे, राहुल तुगांवकर यांनी विशेष सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg