loader
Breaking News
Breaking News
Foto

मळेवाड प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी साकारली ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

मळेवाड - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळेवाड नं. १ येथील विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेतून साकारलेली ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या विद्यार्थिनींनी किल्ल्याची रचना, वास्तू आणि विविध वैशिष्ट्ये बारकाईने अभ्यासून हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. शाळेतील विद्यार्थिनी लावण्या राऊत, स्वरा नाईक, आराध्या नाईक आणि आयशा गावडे यांनी आपल्या कल्पकतेचा व मेहनतीचा सुंदर आविष्कार घडवत ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती तयार केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रतिकृतीमध्ये किल्ल्याची वैशिष्ट्ये आणि वास्तुरचनेतील बारकावे दाखविण्यात आले आहेत. विद्यार्थिनींनी केवळ किल्ल्याची प्रतिकृती साकारली नाही, तर या ऐतिहासिक किल्ल्याची माहितीही आत्मसात केली आहे. प्रतिकृती पाहण्यासाठी येणाऱ्या इतिहासप्रेमींना या विद्यार्थिनी स्वतः किल्ल्याची माहिती सांगत आहेत. त्यांच्या या कलाकृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थिनींच्या कल्पकतेला आणि मेहनतीला प्रोत्साहन मिळत आहे. शालेय वयातच इतिहासाची आवड, कलात्मक दृष्टिकोन आणि सर्जनशीलतेला चालना देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg